तू मेरी नहीं तो किसी की नहीं!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नंदनवन - ती सोळा वर्षांची. तो तिच्याहून वर्षभराने मोठा. दोघेही आईवडिलांपासून दुरावले. एकाच शाळेत असल्याने त्यांची मने जुळली. त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवताच ती भडकली. ‘तू मेरी नहीं तो किसी की नहीं’ म्हणत त्याने तिला मारहाण केली. अल्पवयीन प्रेम प्रकरण पोलिसांत पोहोचले. नंदनवन पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. 

मुलगा अकरावीत तर मुलगी दहावीत. दोघेही एकाच शाळेत. दोघांची ओळख झाली. मुलाला आईवडील नाहीत. तर, मुलीच्या वडिलांचे निधन झाले. तिच्या आईने दुसरे लग्न केले. दोघांचीही स्थिती सारखीच. दोन वर्षांपासून त्यांची मैत्री होती. एकमेकांचे दुःख वाटून घेण्यासाठी दोघेही धावपळ करायचे. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमात आकंठ बुडाल्याने त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, दोघांचेही वय लक्षात घेता शक्‍य नाही. त्याने तिच्याकडे लग्नाचा हट्ट धरला.

तिने लग्नास थेट नकार दिला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने तिला मारहाण केली. प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला. मात्र, मुलीला लग्नाची भानगड नको; म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून, नंदनवनमधील घटना आहे. 

१६ वर्षीय मुलगी संजना (बदललेले नाव) ही श्रीहरीनगरात राहते. तर, आरोपी मुलगा तौफिक (बदललेले नाव) हा खरबीत राहतो. तो लहान असतानाच आईवडिलांचे निधन झाले. तो मामाच्या घरी राहतो. संजनाच्या वडिलांचे निधन झाल्याने आईने दुसरे लग्न केले. ती आजीसह राहते. समदुःखी आणि एकाच शाळेत असल्याने दोघांचीही मैत्री होती.

लग्नाच्या विषयावर भांडण
शुक्रवारी दुपारी तौफिकने तिला सेमिनरी हिल्स परिसरात नेले. संजनाने लग्नास तयार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने तिला जबर मारहाण केली. रात्री दहा वाजतापर्यंत दोघेही लग्नाच्या विषयावर भांडत राहिले. शेवटी रात्री तिला घरी आणून सोडले. तिने पोलिस ठाण्यात तौफिकविरुद्ध तक्रार दिली.

Web Title: love police station crime