पतीला सोडून प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि उघडकीस आली ही घटना...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

सहा महिन्यांपासून त्यांचे प्रेम सुरू होते. मात्र, शनिवारी पहाटे तीन वाजता सीमा राहुल मोहबीया याच्या घरी गेली. घराबाहेरील खिडकीला गळफास लावून तिने आत्महत्या केली. या संदर्भात सीमाच्या आईने आमगाव पोलिसात तक्रार केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

आमगाव (जि. गोंदिया) : सीमा गेंदलाल खंडाते (वय 35, रा. आमगाव) हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर तिला पतीपासून मुलगीही झाली. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणांनी पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत होते. रोजच्या कलहाला कंटाळल्यामुळे सीमाने पतीपासून विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. पतीपासून दूर होत ती माहेरी आईकडे राहायला आली. मात्र, इथे तिचे एका युवकाशी सूत जुळले. यानंतर दोघांमध्ये काय झाले देव जाणे तिने टोकाचे पाऊल उचलले... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा खंडाते ही देवरी तालुक्‍याच्या नरेटीटोला येथील रहिवासी आहे. तिला एक मुलगी आहे. पती-पत्नीचे पटत नसल्यामुळे नेहमी भांडण व्हायचे. सततच्या भांडणाला कंटाळून ती पतीपासून दूर राहू लागली. तिच्यासोबत मुलगीही होती. ती माहेरी देवरी येथे मागील 14 वर्षांपासून आईकडे राहत होती. आईकडे राहत असताना तिने नोकरी करण्याचे ठरवले. यामुळे ती देवरीच्या स्टेट बॅंकेच्या शाखेत खासगी कर्मचारी म्हणून काम करू लागली. मात्र, पतीपासून विभक्त राहत असल्याने तिच्यावर अनेकांची नजर होती. काही युवक तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होते.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

अशात तिचे आमगावातील रहिवासी असलेल्या राहुल मोहबीया या तरुणाशी सूत जुळले. भेटीगाटी, गोष्टीगंपा रंगू लागल्या. राहुलच्या प्रेमात आकंठ बुडालेली सीमा तसेच प्रेमापोटी आमगावला राहायला आली होती. डिसेंबर 2018 मध्ये आमगावात आपल्या मुलीला घेऊन राहायला आलेली सीमा देवरी येथे खासगी नोकरी करीत असताना ये-जा करायची. आमगावला ती भाड्याच्या खोलीत राहात होती. 

सहा महिन्यांपासून त्यांचे प्रेम सुरू होते. मात्र, शनिवारी पहाटे तीन वाजता सीमा राहुल मोहबीया याच्या घरी गेली. घराबाहेरील खिडकीला गळफास लावून तिने आत्महत्या केली. या संदर्भात सीमाच्या आईने आमगाव पोलिसात तक्रार केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

अधिक माहितीसाठी - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

सहा महिन्यांपूर्वी जुळले सूत

सतत भांडण होत असल्यामुळे सीमाने पतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती मुलीला घेऊन आईकडे राहायला आहे. अशात ती राहुल मोहबीच्या प्रेमात पडली. सहा महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. प्रेमात पूर्णपणे बुडाल्यानंतर ती आमगावला भाड्याची खोली करून राहू लागली. सहा महिन्यांपासून आमगावात आलेल्या प्रियसीने चक्क प्रियकराच्या घरी गळफास घेऊन आत्हमत्या केली. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lover commits suicide at Gondia boyfriend's house