प्रियकराने दिली आत्महत्येची धमकी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : महिलांच्या छेडखानीच्या घटना शहरी भागापर्यंतच मर्यादित नसून खेड्यापाड्यापर्यंत हे लोन पसरले आहे. एका विवाहितेच्या घरात घुसून टवाळखोराने तिच्याकडे चक्क चुंबनाची मागणी करून स्वत: आत्महत्येची धमकी दिली.

चांदूररेल्वे तालुक्‍यातील एका गावात ही घटना घडली. संदीप भगवंत वानखडे (वय ३० वर्षे), असे संशयित आरोपीचे नाव आहे. संदीपचा काही दिवसांपासून गावातील एका विवाहितेवर (वय २८) डोळा होता. त्याने काही दिवसांपासून तिचा छुपा पाठलाग सुरू केला. पीडितेने त्याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष केले. त्यामुळे संदीपची हिंमत वाढली. त्याने स्वत:ची इच्छा लादण्यासाठी बळजबरीने विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही, तर त्याने एक पाऊल पुढे जाऊन पीडितेकडे चुंबनाची मागणी केली. येत्या काळात बोलणे टाळल्यास स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकी संशयित संदीपने पीडितेला दिली.

बऱ्याच दिवसांपासून त्याने विवाहितेच्या घरासमोरून चकरा मारायला सुरुवात केली होती. पीडितेने रागावल्यानंतर संदीपने पळ काढला. त्रास वाढल्याने अखेर पीडितेने चांदूररेल्वे ठाण्यात तक्रार केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या एका घटनेत वलगाव ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला दोन लहान मुलींसह घरात असताना संशयित आरोपी विलास प्रकाश निर्मळ (वय ४०) याने अनधिकृतपणे पीडितेच्या घरात घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केले. स्वत:च्या बचावासाठी पीडितेने दूर लोटले असता चिडलेल्या निर्मळने विवाहितेचा गळा आवळला. आरडाओरड केल्यास दोन्ही मुलींना जीवाने मारून टाकेल, अशी धमकी विलासने पीडितेला दिली. वलगाव पोलिसांनी विलास विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

संपादन - नरेश शेळके
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com