प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

चंद्रपूर - पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाचे मृतदेह बोर्डा गावाजवळील विहिरीत आढळून आले. मंगळवारी (ता. 22) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पूजा टेकाम आणि अजय मंगाम अशी मृतांची नाव आहे. बोर्डा येथील पूजा मुरलीधर टेकाम हिचे सावली तालुक्‍यातील सादागड येथील अजय प्रकाश मंगाम या मुलाशी प्रेमसंबंध होते. मात्र, कुटुंबीयांनी पूजाचे अन्य मुलासोबत लग्न ठरविले. पूजा आणि अजय पाच दिवसांपूर्वी घरून निघून गेले. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. आज बोर्डा गावाजवळील विहिरीत या दोघांचे मृतदेह आढळून आले.
Web Title: lover soucide