विवाहबाह्य संबंधातून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शेगाव (बुलडाणा) : शहरात नागपूर येथील एक विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.7) सकाळी मंदिर परिसरातील हॉटेल महाराजा रेसिडेंसीमध्ये उघडकीस आली आहे.
शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. नंदू कृष्णाजी मसराम (वय 40) आणि भारती कैलास सुरपाम (वय 30) असे मृतकाचे नावे असून, दोघेही सलाई गोंधनी धामणा नागपूर येथील राहणार आहेत.

माहितीनुसार, या प्रेमीयुगुलाने 5 ऑक्‍टोबरला शेगाव येथील मंदिर परिसरातील हॉटेल महाराजा रेसिडेंसीमध्ये 205 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली होती. ते दोघे दोन दिवस सोबत राहिले. मात्र, सोमवारी सकाळपासून 205 क्रमांकाच्या खोलीतून हालचाल दिसत नसल्याने आणि प्रतिसाद मिळत नसल्याने व्यवस्थापक शेख असलम शेख युसूफ यांनी बंद असलेल्या खोलीची पाहणी केली. त्यावेळी नंदू आणि भारती दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, दोघांनी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lovers commit suicide out of wedlock