वर्धा नदीत आढळला युगुलाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

आर्वी (जि. वर्धा) - वर्धा नदीच्या कौंडण्यपूर तीरावर युवक-युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. 16) सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रेम प्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. राधा दिवाकर धांदे (वय 16) असे युवतीचे, तर गोपाल वामनराव चौधरी (वय 24) असे मृत युवकाचे नाव आहे.

दोन्ही मृतदेह पाण्यामुळे फुगलेले होते, तर काही ठिकाणी माशांनी लचके तोडल्याचे दिसत होते. हे दोघेही अंजनवती, ता. धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: lovers deathbody receive in wardha river