
जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या भूमिकेपुढे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
रिसोड (जि.वाशीम) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या भेटी-गाठीला उधाण आले आहे. मागील अनेक वर्षांपासून सतरंजा उचलणाऱ्यांना अनेक पक्ष, संघटनाही उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी स्वपक्षातून अन्य पक्षांच्या छावणीमध्ये बस्तान केल्याने अनेकांनी पक्ष निष्ठा खुंटीवर टांगल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठेची परंपरा वदविनाऱ्या हल्ली मात्र पक्षनिष्ठा खुंटीवर टांगली आहे.
स्वपक्षाने पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापतीसह वेगवेगळ्या समित्यावर नियुक्त्या केल्या नंतरही आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी नाकारल्याने अनेक निष्ठावांनी फक्त उमेदवारीसाठी स्वपक्षाची गच्छंती करीत थेट अन्य पक्षाची कास धरल्याचे चित्र आहे. यावर काही पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की, जुणी म्हण आहे की, एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद सर्कल आणि अठरा पंचायत समिती गणासाठी काही पक्ष, संघटनाना उमेदवार सुद्धा सापडले नसल्याने कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढत आहे.
व्हिडिओ पाहा - चैत्या आजही म्हणतो...आई मला शाळेत जायचंय, जाऊ देणं वं
विचित्र परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
काही पक्ष, संघटनांच्या जागेवरील उमेदवार फुकटातच नारळ नेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपच्या गोटातील पक्के कार्यकर्तेच वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीच्या छावणीत दाखल झालेले दिसत आहेत. तर काँग्रेसचे अनेकपदे भुषविणारे माजी पदाधिकारी जनविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानामध्ये दिसत आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळे मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मतदानाविषयी चांगलाच संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा रंगत आहे.
हेही वाचा - महिलांच्या प्रसुतीलाही ग्रहणबाधा
उमेदवारांचा भरोसा कार्यकर्त्यांवर बसेना
मागील एका वर्षामध्ये लोकसभा, विधानसभा, विविध ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यामध्ये अनेक पक्ष-नेत्यांच्या भरोश्यांच्या ठिकाणीच पानिपत झाले. कारण अनेक पक्षातील कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीसाठी पक्ष बदलत असल्याने भावी जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांचा पट्टीतील कार्यकर्त्यावर भरोसा नाय आशा प्रकारची विचित्र अवस्था पहावयास मिळत आहे. तर अनेक उमेदवारांसोबत राहनाऱ्या कार्येकर्त्यांमुळे मतदार लांब जातांना दिसत आहेत.