'दिलासा'चे संस्थापक मधुकर धस यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

घाटंजी, (जि. यवतमाळ) - 'पाणीदार माणूस' म्हणून महाराष्ट्राला ओळख असलेले व येथील "दिलासा' संस्थेचे संस्थापक मधुकर निवृत्ती धस (वय 49) यांचे शुक्रवारी (ता. 2) रात्री मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (ता. 4) सकाळी नऊ वाजता तालुक्‍यातील चोरंबा येथे संस्थेच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धस हे मूळचे मराठवाड्यातील भोगची (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी. त्यांनी "दिलासा' ही संस्था स्थापन केली. त्यातून त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना धान्य, शेतीकरिता व मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. आतापर्यंत जवळपास 75 हजार शेतकरी कुटुंबीयांना मदत केली आहे. निराश्रित शिक्षणाकरिता हसरे घरकुल योजना सुरू केली. ग्रामीण भागात नावीन्यपूर्ण पुरस्कार नाबार्डतर्फे देण्यात आला.

Web Title: madhukar dhas death