पत्रकार प्रसाद नायगावकर यांना पितृशोक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

घाटंजी तालुक्यातील अंजी येथील नृसिंह सरस्वतीचे मंदिरात दरवर्षी कीर्तन करीत व बाभूळगाव तालुक्यातिल कोपरा जानकर येथे शिंदे पाटील यांच्या घरी श्रीमदभागवत कथा वाचन करायचे. त्यांना पवित्र ग्रंथ कुराणचाही अभ्यास होता. पूजेत दान स्वरूपात मिळालेली रक्कम ते गरिबांना मदत म्हणून देत.

यवतमाळ  : 'साम' वाहिनीचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रसाद नायगावकर यांचे वडील मधुकरराव त्रिम्बकराव नायगावकर (वय 74) यांचे सोमवारी सकाळी साडेसहाला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून L/18  विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथून आज, सोमवारी रात्री 8.30 वा. निघून पांढरकवडा मार्गावरील हिंदू मोक्षधामात अंत्यसंस्कार होतील. ते यवतमाळ येथील डाक कार्यालयातून पोस्टमास्टर पदावरून सेवानिवृत्त झाले. वेदांचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्रीमदद्भागवत कथा केल्या.

घाटंजी तालुक्यातील अंजी येथील नृसिंह सरस्वतीचे मंदिरात दरवर्षी कीर्तन करीत व बाभूळगाव तालुक्यातिल कोपरा जानकर येथे शिंदे पाटील यांच्या घरी श्रीमदभागवत कथा वाचन करायचे. त्यांना पवित्र ग्रंथ कुराणचाही अभ्यास होता. पूजेत दान स्वरूपात मिळालेली रक्कम ते गरिबांना मदत म्हणून देत.

Web Title: Madhukar Naigaonkar passed away