शेतीशिवारात रोबोटची जादू

प्रशांत रॉय
रविवार, 28 जुलै 2019

नागपूर : काही वर्षांपूर्वी एका चित्रपटात परग्रहावरील "जादू' या पात्राने धमाल उडवली होती. सूर्याच्या किरणांनी त्याला ऊर्जा मिळते आणि तो अचाट कामे करतो, असा भन्नाट विषय त्यात हाताळला होता. शेतीमध्येही असा "जादू' आता "ऍग्री रोबोट'च्या स्वरूपात दिसणार आहे. फरक फक्त एवढाच की, तो आधुनिक अशा "5 जी' आणि "एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणार आहे. अवघड, कंटाळवाणी कामे सोपी करताना लवकरच "ऍग्री रोबोट'ची जादू शेतीशिवारात दिसायला लागणार आहे.

चीनमधील "दी फुजीयान अकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चर सायन्स' आणि "दी फुजीयान न्यूलॅंड इरा हाय टेक कंपनी'ने 5-जी तंत्रज्ञानाचा वापर करून हा ऍग्री रोबोट विकसित केला आहे. "ग्रीन हाउस'मध्ये या रोबोटचे प्रात्यक्षित झाले असून हिरव्या पालेभाज्यांच्या दोन ओळींमध्ये याचे "सेन्सर' सहजपणे फिरून माहिती घेतात. त्या रोपाचा "डाटा' एकत्र करून तो नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) पाठविला जातो. त्या ठिकाणी विविध रोप/झाडांच्या संकलित केलेल्या "डाटा'वर एआयच्या साहाय्याने विश्‍लेषण केले जाते. येत्या काळात बहुमुखी (व्हर्सटाइल) रोबोट तयार करण्यावर भर राहणार असल्याचे येथील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मुळात कृषी हवामान हा घटकच जटिल आहे. ही बाब स्वीकारून शेतीसाठी उपयोगी असा रोबोट बनविण्याचे तंत्रज्ञांपुढे आव्हान होते. उद्योगातील वातावरण आणि कृषीचे वातावरण यामध्ये मोठा फरक आहे. याविषयी संपूर्ण अभ्यास केल्यानंतर सोपी आणि उपयुक्त, अशी "एआय' पद्धती विकसित करण्यात आली. खते देणे, रोप-झाडांना सिंचनाची सोय करणे, शेतीतील अनियमित रस्त्यांची माहिती व्हावी यासह शिवारातील इतर घटकांना ध्यानात ठेवून संगणकीय अल्गोरिथम, पोजिशनिंग हार्डवेअर, मॅप डिझायनिंग करण्यात आले. यामुळे हा रोबोट रोपाचे आरोग्य कसे आहे, याची नोंद घेऊन आवश्‍यक त्या नियंत्रण व व्यवस्थापनाच्या पद्धती सुचवतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The magic of robots in the farm