Maharashtra Assembly Winter Session
esakal
Maharashtra Winter Assembly Session: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर करताना या योजनेसाठी सहा हजार कोटींची तरतूद केली असल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे. राज्यात महायुतीला बळ देण्यात महिलांची मोठी भूमिका राहिली आहे. महिला सक्षमीकरणाचा अजेंडा पुढे नेत सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसाठी या पुरवणी मागण्यांमध्ये सहा हजार एकशे तीन कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.