Buldhana Farmer Crisis: 10 acres yield only 12 quintal soyabean

Buldhana Farmer Crisis: 10 acres yield only 12 quintal soyabean

esakal

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Farmer Crisis : पावसाचे अनियमित आगमन, पिकांवर कीड व रोगराई त्यामुळे १० एकर शेतात केवळ १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले. अशावेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. या विवंचनेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
Published on

कारंजा, ता.२५: धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेहा गावात नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याने हैराण झालेल्या एका शेतकरीपुत्राने आयुष्य संपवलं आहे. शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रफुल भास्करराव कडू (वय ३६ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. ते कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवाशी असल्याची माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com