Ladki Bahin Yojana: ५१ हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला; लाभार्थ्यांची होणार पडताळणी, जिल्हा महिला बालविकास विभागाची माहिती
Buldhana Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ५१ हजारांहून अधिक लाभार्थींचा अनुदान तात्पुरता थांबवण्यात आला आहे. शासनाने एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना व ६५ वर्षावरील महिलांना योजनेचा लाभ देणे बंद केले आहे.
बुलडाणा : विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली, परंतू आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे.