महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

Yellow Alert in Maharashtra : राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी अकोला हे सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. तर अमरावती आणि वर्धा येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Maharashtra heatwave

Maharashtra heatwave

esakal

Updated on

उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापला असतानाच विदर्भ अक्षरशः होरपळून निघत आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १५) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने, तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com