ठरलं, अखेर ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य पक्षीसप्ताह जाहीर

file photo
file photo

अमरावती : पाच नोव्हेंबर हा प्रख्यात वन्यजीव अभ्यासक व पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस; तर १२ नोव्हेंबर भारतीय पक्षी शास्त्राचे जनक डॉ. सलीम अली यांची पुण्यतिथी असून या कालावधीत पक्षीसप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत मंडळाचे अमरावतीचे सदस्य यादव तरटे यांनी हा विषय ठेवून पाठपुरावा केला होता. त्यावरून शासननिर्णय आज, मंगळवारी (ता. २७) निर्गमित झाला. विशेष म्हणजे पक्षीसप्ताह साजरा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले एकमेव राज्य ठरले आहे.

संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती

या सप्ताहात पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त, धोकाग्रस्त पक्षी व त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

सर्वसामान्य नागरिकांसाठी पक्षी छायाचित्र प्रदर्शन, स्पर्धा आयोजित करण्यात याव्या, शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शन, कार्यशाळा, माहितीपट इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.


मागणीला मूर्तरूप आले
महाराष्ट्र राज्य पक्षीसप्ताह जाहीर झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत मी हा विषय ठेवला होता. राज्यातील तमाम पक्षिमित्रांच्या अनेक वर्षांच्या मागणीला मूर्तरूप आले आहे.
- यादव तरटे
सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com