अमरावती विभागात वाशीमने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

अमरावती : माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहिर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल 88.08 टक्के असून विभागात वाशीम जिल्ह्याने यंदाही अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवली. यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक सर्वांत शेवटी आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत अमरावती विभागाच्या निकालाची टक्केवारी जवळपास सारखीच आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी दुपारी निकालाबाबत माहिती दिली. विभागात एकूण 1 लाख 44 हजार 237 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते; त्यात 78 हजार 484 मुले व 65 हजार 753 मुली होत्या. यांतून 1 लाख 27 हजार 45 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यात 60 हजार 392 मुली व 66 हजार 653 मुलांचा समावेश आहे.

वाशीम जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वाधिक लागला. 17 हजार 793 पैकी 10 हजार 84 विद्यार्थी येथून उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवरी 90.40 एवढी आहे. वाशीमपाठोपाठ बुलडाणा जिल्हा असून 32 हजारपैकी 28 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 89.71 एवढी आहे.

अकोला जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर असून 25 हजार 700 पैकी 22 हजार 700 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झाले. 88.30 एवढी निकालाची टक्केवारी आहे. चौथ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा असून निकालाची टक्केवारी 87.49 एवढी आहे.
अमरावती जिल्हयात 36 हजार 973 पैकी 32 हजार 345 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळ जिल्हा विभागात सर्वाधिक माघारला. 31 हजार 758 पैकी 27 हजार 200 विद्यार्थी येथून उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.65 एवढी आहे.

कॉपीची प्रकरणे

  • अमरावती : 122
  • वाशीम : 46
  • अकोला : 27
  • यवतमाळ : 12
  • बुलडाणा : 05
Web Title: maharashtra state board hsc result and washim top in amravati board