Vidhan Sabha 2019 : अमरावती : डॉ. सुनील देशमुखांसमोर सुलभाताईंचे कडवे आव्हान

सुरेंद्र चापोरकर
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेसच्या सुलभा खोडके यांच्यात थेट लढत होईल. दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत. हा मतदारसंघ मिळावा म्हणून काँग्रेसने प्रचंड आटापिटा केला होता. तो यशस्वी झाला. पण त्या यशासाठी राष्ट्रवादीकडूनच उमेदवारी मागणाऱ्या सुलभाताईंना आयात करून त्यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी लागली.

विधानसभा 2019 : भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेसच्या सुलभा खोडके यांच्यात थेट लढत होईल. दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत. हा मतदारसंघ मिळावा म्हणून काँग्रेसने प्रचंड आटापिटा केला होता. तो यशस्वी झाला. पण त्या यशासाठी राष्ट्रवादीकडूनच उमेदवारी मागणाऱ्या सुलभाताईंना आयात करून त्यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी लागली. अगोदर हा मतदारसंघ काँग्रेसचा म्हणून ओळखला जात होता. मात्र दहा वर्षांमध्ये भाजपने संघटन मजबूत केले आहे. मूळचे काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख हे भाजपत आले आणि तेव्हापासून येथे भाजपचा आमदार आहे.

डॉ. सुनील देशमुख
बलस्थाने

    अनुभवी व अभ्यासू
    विकासकामांचा धडाका
    मूळचे काँग्रेसचे असल्याने येथेही चांगला संपर्क

कमजोरी
    अनेक वर्षांपासून आमदार असल्याने नाराजी
    जनसंपर्क कमी.

सुलभा खोडके
बलस्थाने

    नवीन चेहरा असल्याचा फायदा
    महिला उमेदवार असल्यामुळे महिला मतदारांचा लाभ
    अल्पसंख्याक समाजाचे पाठबळ

कमजोरी
    पक्षबदल केल्यामुळे नाराजी
    मतदारसंघ बदलल्याने नव्याने प्रचारयंत्रणा बांधणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 amravati constituency politics