"हस्तकला प्रकारात महाराष्ट्राची "वारली चित्रशैली" अव्वल

विरेंद्रसिंह राजपूत
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील शिक्षकांनी तयार केलेला 'वारली चित्रशैली प्रकल्प' देशातून सर्वोत्कृष्ट ठरला आहे. महाराष्ट्रातील 9 शिक्षकांनी तयार केलेल्या या प्रकल्पाचे नेतृत्व नांदुरा तालुक्यातील प्रेमचंद राठोड या शिक्षकाने केले आहे.

देशभरातील शिक्षकांकरिता 'शालेय शिक्षणात हस्तकला कौशल्याचा समावेश' या विषयाची राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळा 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था हैदराबाद येथे घेण्यात आली असता सर्व राज्यातील शिक्षकांनी यात भाग घेतला. त्यात महाराष्ट्रातील शिक्षकांनी 'वारली चित्रशैली'या विषयावर उत्तम असा प्रकल्प सादर केला.

सदर प्रकल्पात नांदुरा तालुक्यातील शिक्षक प्रेमचंद राठोड यांनी घडीचित्र या नाविन्यपूर्ण बाबीचा वापर करून उत्कृष्ठ सादरीकरण केले. त्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील कुंदन वायकुले, अनिल गायकवाड, संदीप इंगळे, निलेश मिसाळ, धनाजी कोळी, नानाजी चौधरी, सुनील सरपाटे, वर्धा, बाबू खंदारे या शिक्षकांची साथ लाभल्याने या प्रकल्पाला देशातून अव्वल नामांकन घोषित करण्यात आले. त्यावेळी हैदराबाद प्रशिक्षण केंद्राचे विभागीय संचालक जी. कृष्णय्या, कार्यशाळा संचालिका डॉ.लिपिका मैत्रा यांनी या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील जि.प.शाळेवर कार्यरत प्रेमचंद राठोड या शिक्षकाने केलेल्या या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Web Title: maharashtra warali painting top in handy craft