Maratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

अमरावती - मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आज बंद पुकारण्यात आला असून अमरावती शहरात सकाळपासूनच हा बंद कडकडीत दिसून येत आहे.  

मध्यवर्ती बस स्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारावर व्यापक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकही बस आज या स्थानकातून बाहेर पडलेली नाही. सर्व शाळा, महाविद्यालय, पेट्रोल पंप तसेच सिटीबस सुद्धा बंद आहे. अकरा वाजताच्या सुमारास राजकमल चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी एकत्र येणार असून दुपारी हा मोर्चा शिवटेकडी कडे प्रस्थान करेल असे नियोजन आहे. 

या मोर्चाच्या निमित्ताने शहराच्या सर्व मुख्य चौकांमध्ये तसेच मार्गावर व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी आज राजकमल चौक शहराच्या प्रमुख आणि करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.

Web Title: #Maharashtrabandh Maratha Kranti Morcha bandh in amravati