महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना घेणार अण्णा हजारेंची भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

अकोला  ः महाराष्‍ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची राळेगावसिध्दी येथे आज (ता.२४) ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांना आपल्या समस्यां संदर्भात भेटणार आहेत.

अकोला  ः महाराष्‍ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची राळेगावसिध्दी येथे आज (ता.२४) ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांना आपल्या समस्यां संदर्भात भेटणार आहेत.

सन २००५ नंतर लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू व्हावी. या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनच्या मार्फत गेल्या तीन वर्षापासून संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात आलेली आहेत. त्यांत सर्वप्रथम नागपुर येथे आक्रोश मोर्चा, मुंबई येथे मोर्चा, नागपुर येथे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण, नागपुर येथे महाआक्रोश मुंडनमोर्चा, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाच दिवशी घंटानाद आंदोलन करण्यात येऊन हा लढा सुरु ठेवलेला आहे.

अनेक ठिकाणी न्यायालयात खटलेही दाखल झालेले आहेत. आता हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी येत्या जुलै महिन्यात शिवनेरी ते चैत्यभूमी लॉग मार्चे व मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्याचे नियोजन आहे. त्या आंदोलनास ज्येष्ठ गांधीवादी समाजसुधारक आण्णा हजारे यांचा पाठींबा मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनची राज्यकार्यकारणी व सभासदांचे शिष्टमंडळ येत्या आज (ता.२४) आण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी येथे जाऊन भेट घेणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जुनी पेंशन मागणीसाठीचे आंदोलन महाराष्ट्रभर जोर धरणार असल्याची माहिती संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष रामदास वाघ यांनी दिली.

Web Title: maharashtra's old pension rights association visit to anna hajare's