400 वर्षापूर्वीचे पुरातन शिव मंदिर; भक्तही होतात तल्लीन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

बाळापूर (जि. अकोला) : शहर ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध असून, येथे तब्बल 400 वर्षांपूर्वीचे
चिचपेंड शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीला शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...' अशा जयघोषात महादेवांचे भाविक तल्लीन होऊन मंदिरात जातात. यंदाही येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे वाचा - बच्चू कडूंचा ताफा अडविला; मग घडले असे...
शिवलिंगाला जलाभिषेक वाहण्याची परंपरा आहे.
 
चिचपेंड तपोवन शिवमंदिर संस्थान हे प्रसिद्ध प्राचीन जागृत देवस्थान असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 70 फूट उंच असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची मूर्ती आहे. मंदिर बाळापूरच्या दक्षिणेस तीन किलोमीटर दूर असून, महेश नदीच्या तीरावर वसलेले आहे. फार प्राचीन असलेल्या सत्वलिंग तपोवन शिवमंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर भावभक्तीने या मंदिराचे व्यवस्थापन केले जात आहे. मंदिराला सत्वलिंग असेही संबोधले जाते. येथील चिचपेंड शिवभक्त मंडळाची अनेक तीर्थक्षेत्राहून तीर्थ आणून शिवलिंगाला जलाभिषेक वाहण्याची परंपरा आहे. चिचपेंड येथील निसर्गरम्य वातावरण भक्त व पर्यटकांना आकर्षित करणारे आहे.

क्लिक करा - लाच प्रकरण भोवले; आता वेतनवाढीचे वांदे!
दोन दिवस चालतील विविध कार्यक्रम

शुक्रवारी (ता.21) 11 जोडप्यांच्या हस्ते होमहवन यज्ञ, महादेव अभिषेक केल्या जाणार आहे. प्रसादासह रात्री 51 दिव्यांचा दीपोत्सव व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. (ता.22) सकाळी नऊ वाजता गोपालकाला, दुपारी 12 ते 4 महाप्रसाद व सायंकाळी पाच वाजता महादेवाची शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. चिंचपेड संस्थान येथे महाशिवरात्री यात्रेचा लाभ घ्यावा. असे आवाहन चिंचपेड संस्थान मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashivratri 2020