esakal | सिंदखेडराजात महाविकास आघाडीचा बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

buldhana

सिंदखेडराजात महाविकास आघाडीचा बोलबाला

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा : तालुका खरेदी विक्री संघ या संस्थेच्या प्रशासकीय मंडळावर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीचे बोलबाला पहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ खरेदी विक्री संघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आला आहे. नगर परिषद ,कृषी उत्पन्न बाजार समिती व आत खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडीचे सर्वोच्च पाहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वातावरण निर्माण झाले आहे. (Buldana News)

खरेदी विक्री संघाच्या प्रशासकीय मंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रशास म्हणून रमेश जनार्धन खरात तर प्रशासक म्हणून संतोष साहेबराव कायंदे, विलास सीताराम रिंढे,बंडू भावसिंग पवार, विठ्ठल उत्तमराव गायके, मोहम्मद शफी जमादार, विलासराव सखाराम शेवाळे, गजानन विक्रम तुपकर, भरत अण्णासाहेब भोसले,शिवाजी शामराव गुंजाळ, सुभाष धोंडीराम जाधव, विद्या संजय सोनुने, जुनेद अली मुनावर अली, आशा संजय जायभाये, वीरेंद्र बापू गोविंदराव देशमुख, योगेश ठकाजी खरात, सिद्धेश्वर गैबी आंधळे, संतोष शामराव मेरत यांची अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: राजू शेट्टींचे नाव वगळले? अजित पवार यांनी दिलं स्पष्ट उत्तर

यावेळी मुख्य प्रशासक रमेश खरात यांनी सांगितले की,स्वच्छ कारभार व शेतकरी आणि शेती यांचं हित जोपासत खरेदी विक्री संघाचे नावलौकिक उंचावत ठेवणार आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वांना सोबत घेवून घेतले जाणार आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नेहमीच वाढ व्हावी, यासाठी खरेदी विक्री संघाच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी दैनिक सकाळ सोबत बोलतांना सांगितले आहे.

loading image
go to top