नागपूर तालुक्‍यात येणार  महिलाराज

file Photo
file Photo


वाडी, ता. 14 : नागपूर शहराच्या अवतीभोवतीच्या गावांत पसरलेल्या नागपूर तालुक्‍यात शहरीकरणाचे वारे शिरू लागले आहेत. यामुळे येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनादेखील राजकारणाचे चांगलेच डोहाळे लागले आहे. विशेषत: जिल्हा परिषदेच्या निवडणुका यामुळेच अटीतटीच्या होणार असल्याचे संकेत मिळू लागले असतानाच यावेळी आरक्षणामुळे तालुक्‍यातील राजकारणात महिलाराज येणार आहे. 

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समीर मेघे यांनी तब्बल 46 हजार मतांनी भरघोस विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय घोडमारे यांनी 75 हजार पेक्षा जास्त मते घेऊन आपली बाजू मजबूत केली. शहराला लागून असलेल्या या नागपूर ग्रामीण तालुक्‍यात एकूण सहा जिल्हा परिषद सर्कल असून त्यापैकी चार जांगावर महिला आरक्षण निघाले आहे. यामुळे अनेकांची गोची झाली आहे. गोधनी-रेल्वे ओबीसी महिलेसाठी राखीव, सोनेगाव निपाणी अनुसूचित जाती महिला, बेसा अनुसूचित जाती महिला, तर बोरखेडी-फाटक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित तर उर्वरित दवलामेटी सर्कल सर्वसाधारण व खरबी अनुसूचित जाती सर्वसाधारण झाल्याने प्रत्येक पक्षातील महिला इच्छुकांची मांदियाळी या सर्कलमध्ये दिसून येत आहे. 


सोनेगाव निपाणी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने येथे कॉंग्रेसकडून भारती पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत. भाजपकडून अश्विनी भोयर यांच्यासह लावाच्या सरपंच जोत्स्ना नितनवरे यांचे नाव चर्चेत आहे. दवलामेटीमधून सुजित नितनवरे भाजपकडून प्रमुख दावेदार आहेत. भोजराज घोडमारे, गजानन रामेकर, देवराव कडू हेदेखील प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे दिवाकर पाटणे व पुरुषोत्तम गोरे, कॉंग्रेसकडून विद्यमान जि. प. सदस्य सुनील जामगडे, रॉबिन शेलारे, महेश चोखांद्रे व सुजित अतिकारी, वंचितकडून प्रकाश मेश्राम यांची चर्चा आहे. गोधनीमधून भाजपच्या नम्रता राऊत, कॉंग्रेसकडून युवा नेत्या कुंदा राऊत यांची नावे चर्चेत आहेत. बेसामधून दिलीप नंदागवळी यांच्या पत्नी सुनंदा नंदागवळीसह ज्योती मानकर, कॉंग्रेसकडून पुरुषोत्तम कांबळे यांच्या सौभाग्यवतीच्या ही नावची चर्चा आहे. खरबीमधून भाजपचे मनोज चौरे, चंद्रमणी नगराळे यांचेही नाव चर्चेत आहे. 

बोरखेडीमधून रूपराव शिंगणे हे पत्नीसाठी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय अनिल ठाकरे हे त्यांच्या सौभाग्यवतीला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वृंदा प्रकाश नागपुरे यांचे नाव चर्चेत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com