माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

Yavatmal Devotees Killed in Tempo Crash : माहूर घाटातील पहिल्या धोकादायक वळणावरून सुमारे शंभर फूट खोल दरीत टेम्पो कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह केबिनमध्ये बसलेले अन्य दोघे किरकोळ जखमी होऊन बचावले.
Mahur Ghat Accident

Yavatmal Devotees Killed in Tempo Crash

esakal

Updated on: 

महागाव : श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावर आलेल्या यवतमाळ येथील सहा भाविकांच्या टेम्पोला परतीच्या प्रवासात भीषण अपघात झाला. माहूर घाटातील पहिल्या धोकादायक वळणावरून सुमारे शंभर फूट खोल दरीत टेम्पो कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह केबिनमध्ये बसलेले अन्य दोघे किरकोळ जखमी होऊन बचावले. गुरुवारी (ता. १६) पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com