दसरा मैदानावर अग्नितांडव

file photo
file photo

भंडारा : शहरातील हुतात्मा उद्यानालगत दसरा मैदानावर ठेवलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या शेकडो केबल पाइपला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घटनास्थळापासून 10 कि.मी. अंतरावर सर्वदूर आकाशात धुराचे लोळ पसरले होते.
भंडारा शहरासाठी 57 कोटी रुपयांची नवीन नळयोजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराने एचडीपीई केबल पाइपचे शेकडो बंडल दोन महिन्यांपूर्वीच हुतात्मा उद्यानालगत ठेवले होते. या केबल पाइपला आज अचानक आग लागली. प्लॅस्टिक, रबर व ऑइलयुक्त असे ज्वलनशील पदार्थ असल्याने ही आग लवकर भडकली. आगीचा धूर सर्वत्र पसरल्याने घटनेची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. याच ठिकाणी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची टाकी आहे. या टाकीपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचत होत्या. त्या ठिकाणी असलेले कार्यालय देखील या आगीमुळे जळाले. तर जवळच असलेल्या उद्यानातील झाडेही जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
अर्धा तासाने पोहोचले अग्निशामक दल
आग लागल्यानंतर अर्धा तास होऊनही नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी उशीर झाला. आगीची तीव्रता लक्षात घेता जवळच असलेली पाण्याच्या टाकीलासुद्धा नुकसान होण्याची शक्‍यता होती. टाकीलगत असलेली पाणी पुरवठा विभागाची चौकी, उद्यानातील झाडांपर्यत ही आग पोहोचली होती. त्यामुळे संपूर्ण बगीचा व लागून असलेल्या वाचनालयापर्यंत आग पोहोचण्याची भीती होती. अखेर अर्धा तासाने आग विझविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com