

Seven Injured as Speeding Trailer Rams MSRTC Bus in Bhandara
sakal
साकोली (जि. भंडारा): येथील लाखांदूर रोड वळणावरील माकोडे पेट्रोलपंपाजवळ भरधाव ट्रेलरने एसटी बसला धडक दिली. या भीषण अपघातात बसचालक आणि वाहकासह एकूण सात प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.