सेरेब्रल पाल्सी मुलांना ध्येयवेडे बनवा 

नागपूर : सेरेब्रल पाल्सीग्रस्त चिमुकल्याला कडेवर घेऊन उपचारासाठी आणणारी माता.
नागपूर : सेरेब्रल पाल्सीग्रस्त चिमुकल्याला कडेवर घेऊन उपचारासाठी आणणारी माता.

नागपूर : शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा श्रेयस वर्षभराचा असताना सेरेब्रेल पाल्सी असल्याचे निदान झाले. उभे होण्याचे बळ पायात नव्हते. हाताची बोटही वाकडी होती. आज मात्र तो गणित सोडवतो. फावल्या वेळात मैदानी खेळ व बुद्धिबळ खेळतो. भविष्यात त्याला खेळाडू किंवा गणितज्ञ बनण्याची इच्छा आहे. अशी एक दोन नव्हे तर अनेक चिमुकल्यांचे जगणे सेरेब्रल पाल्सीमुळे कठीण झाले होते. त्यांच्यात जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करण्यात मुंबईचे डॉ. गुलबानो प्रेमजी आणि डॉ. पेरीन मुल्ला फिरोज तसेच नागपूरचे डॉ. विराज शिंगाडे यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना सेरेब्रल पाल्सीचा आजार घेऊन जगणाऱ्या मुलांनी व्यक्त केली. या मुलांना ध्येयवेडे बनवण्याचा ध्यास डॉक्‍टरांनी स्वीकारावा, असे आवाहन रविवारी आयोजित कार्यशाळेतून करण्यात आले. 
नागाई नारायणजी मेमोरियल फाउंडेशन, पेडियाट्रिक थेरेपिस्ट असोसिएशन आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्‍स आणि प्रविरा हॉस्पिटल व चिल्ड्रन ऑर्थोपेडिस केअर इन्स्टिट्यूटतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा उपराजधानीत घेण्यात आली. जन्मजात बालकांना मिळणारी ही अवस्था कुटुंबाला काळजीत टाकणारी असते. बालकांचे पुनर्वसन करून भागत नाही तर फिजिओथेरपी, शल्यक्रिया आणि औषधोपचार अशा तिहेरी पातळ्यांवर उपचार करण्याची गरज असल्याचे डॉ. शिंगाडे यांनी सांगितले. डॉ. भेलोंडे यांनी फिजिओथेरेपीचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेसाठी आलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यातील डॉक्‍टरांना सेरेब्रल पाल्सीशी झुंजणाऱ्या बालकांना थेरेपी, शल्यक्रिया, औषधोपचार अशा त्रिसूत्रीचा आधार घेऊन प्रशिक्षण देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com