Malegaon Crime : पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

शाळेत जाणाऱ्या शिक्षकावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर पेट्रोल टाकून जाळले. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
fire
fireSakal

मालेगाव, (जि. वाशीम) - शाळेत जाणाऱ्या शिक्षकावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर पेट्रोल टाकून जाळले. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिलीप धोंडुजी सोनुने (वय ५४) हे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोनुने यांचा वाशीम जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मालेगाव शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे सोनुने बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून ते बोरगावला जाण्यासाठी निघाले. मालेगाव शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर कोल्ही गावाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

डोक्यात जोरदार प्रहार केल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दिलीप सोनुने यांच्यावर हल्लेखोरांनी सोबत आणलेले पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. रस्त्याने जाणारे नागरिकही या घटनेमुळे भयभीत झाले. पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे वाशीम जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com