महिकोच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे

महिकोच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे

मलकापूर - विनापरवाना बियाण्यांची साठवणूक केल्याने महिको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह अधिकाऱ्यांवर बुधवारी (ता. 20) पहाटे गुन्हे नोंदविण्यात आले.

मलकापूर- नांदुरा महामार्गावर धानोरा गावानजीक महिको कंपनीचे गोदाम व प्रक्रिया केंद्र आहे. या गोदामात बीटी कपाशीसह विविध प्रकारच्या बियाण्यांचा अनधिकृत साठा असल्याच्या संशयावरून पोलिस व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ डिसेंबर रोजी छापा टाकून गोदाम सील केले होते. त्यानंतर येथील बियाण्यांचे नमुने घेऊन नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, कृषी विभागाने कंपनीकडे बियाणे साठवणुकीचा परवाना मागितला. मात्र, कंपनीकडे हा परवाना नसल्याचे आढळून आले. विनापरवाना बियाण्यांची साठवणूक करून फसवणूक केल्याची फिर्याद कृषी विभागातील बियाणे निरीक्षक अनंत चोपडे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी महिको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ व विभागीय व्यवस्थापक विलास पंढरी खूज (रा. जालना), विभागीय विक्री व्यवस्थापक श्रीपाद लक्ष्मण पाटील (रा. पुणे), महिको धानोरा केंद्राचे प्रमुख शैलेंद्र हरीश बागराव यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे नोंदविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com