बुलडाणा कोरोनामुक्तीकडे; मात्र, त्या दोन महिला या जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळ्याने वाढली चिंता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

मलकापूर येथीलच अल्पसंख्यांक समाजाची एक महिला डायबेटीजच्या आजारावर उपचार घेण्यास बऱ्हाणपूर येथे गेली असता त्याठिकाणी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. 

मलकापूर (जि.बुलडाणा) : जिल्ह्यातील कोरोना संसर्गितांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने त्यांना एकापाठोपाठ सुटी देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्‍ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परिसरातील एक 65 वर्षीय महिला जळगाव खांदेश येथे निमोनिया आजारावर उपचारासाठी गेली असता तेथे तिची कोरोना चाचणी करण्यात आली. आज प्राप्त झालेल्या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

मलकापूर शहरातील अल्पसंख्यांक समाजातील एका व्यक्तीचा 9 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर त्याच्याच कुटुंबातील आणखी तीन व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागन झाली असल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले होते. त्यानंतर मलकापूर येथीलच अल्पसंख्यांक समाजाची एक महिला डायबेटीजच्या आजारावर उपचार घेण्यास बऱ्हाणपूर येथे गेली असता त्याठिकाणी तिची कोरोना चाचणी करण्यात आली.

आवश्‍यक वाचा - अन् पोलिस सापडला जुगार खेळताना!

यावेळी ती सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. महिला ही मलकापूर येथे पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या भावाच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाली होती. सदर महिला ही मलकापूर येथीलच रहिवासी असून, ती बऱ्हाणपूर येथे उपचारार्थ गेली होती व तेथेच तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मलकापूर शहरात खळबळ उडाली होती.

हेही वाचा - ...म्हणून ॲड.प्रकाश आंबेडकरांनी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसला मागितला होता!

तर आज २५ एप्रिल रोजी पुन्हा मलकापूर ग्रामीणमध्ये येत असलेल्या हनुमान नगर परिसरातील एक 65 वर्षीय महिला जळगाव खांदेश येथे काही दिवसांपूर्वी निमोनीया आजारावर उपचार घेण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी 21 एप्रिल रोजी तिचे कोरोना स्वॅब घेवून तपासणी करिता पाठविण्यात आले होते. त्या स्वॅबचा रिपोर्ट आज प्राप्त झाला असून, त्यामध्ये त्या महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला असल्याचे जळगाव खान्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

आज दुपारीच मलकापूर येथील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला दुपारी 1 वाजता सुटी देण्यात आली होती. त्यानंतर मलकापूर शहरातील कोरोना संसर्गितांचा आकडा हा कमी होत असल्याचे चित्र होते. मात्र, सायंकाळी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत परिसरातील जळगाव येथे उपचारासाठी गेलेल्या महिलेला कोरोनाची लागन झाल्याचे वृत्त धडकताच सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malkapur's two women found positive in jalgaon khandesh and raised concerns