सापाला बाहेर काढण्यासाठी पेटविले लिंबाचे झाड, आगीने रौद्ररूप घेऊनही सुदैवाने बचावला साप

man burned tree to snake get snake out in kalamb of yavatmal
man burned tree to snake get snake out in kalamb of yavatmal

कळंब (जि. यवतमाळ) : कळंब येथील शिवाजी चौकाजवळ रासा रोडवरील एका दुकानासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडामध्ये साप आढळून आला. त्याला बाहेर काढण्यासाठी एका व्यक्तीने पेटलेला कापडाचा बोळा त्या खोडात टाकल्याने संपूर्ण झाडाने पेट घेतला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली असून सापाला कुठलीही इजा झालेली नाही. 

शरद मोहोड टेलर व साई समर्थ किराणा स्टोअरचे प्रमोद धनुसकर यांच्या दुकानासमोर पाच वर्ष जुने कडू लिंबाचे झाड आहे. त्या झाडामध्ये बिनविषारी साप गेल्याचे एका व्यक्तीला दिसले. त्याला बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीने पेटत्या कापडाचा बोळा झाडाच्या खोडात टाकला. मात्र, साप बाहेर आला नाही. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरातील दुकानांना आग लागण्याची भीती निर्माण झाली.

तत्काळ नगरपंचायतला कळवून यवतमाळ येथून अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. त्याचवेळी झाडाच्या ढोलीतून एक धामण जातीचा साप बाहेर आला. त्याला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून एका बाटलीत बंद केले. त्यामुळे कुणाचेही नुकसान झाले नाही. ही आग विझविण्यासाठी अग्निशमनदलाच्या जवानांसह कळंब नगरपंचायतीचे कर्मचारी सुनील मगर, खुशाल ठाकरे, आदित्य कळमकर, अवि वेलके, खुशाल ठाकरे, शागिर्द खान व नागरिकांनी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com