esakal | वाढदिवसच ठरला आयुष्याचा अखेरचा दिवस, प्रेमकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

सूरज बंडू कुडके

वाढदिवसच ठरला आयुष्याचा अखेरचा दिवस, प्रेमकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर (chimur chandrapur) तालुक्यातील वहानगाव येथील २७ वर्षीय तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच कडूनिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळ साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: सोयाबीन फुलोऱ्यावर येताच भावात घसरण, आता क्विंटलला इतका दर

सूरज बंडू कुडके, असे मृत तरुणाचे नाव होते. तो शेडगाव येथील सीएमपीडीआय कॅम्पमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. सूरजचा २ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस असल्याने मित्र-मंडळी घरी जमले होते. मात्र, सूरज सायंकाळी ७ वाजतापासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला. मात्र, सूरजचा पत्ता लागला नाही. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी शेतावर जात असताना सरूज राष्ट्रीय महामार्गावरील प्रभू दोडके यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याची माहिती त्यांनी गावात येऊन त्याच्या कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रशांत कोल्हे यांनी शेगाव पोलिसांना संपर्क साधला. मात्र, शेगाव पोलिसांकडून दाद मिळाली नाही.

पोलिस येतपर्यंत तब्बल अंदाजे चार तास प्रेत लटकतच होते. पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखरे शेगाव पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्ष सरोदे, सहाय्यक फौजदार धारणे घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले. आत्महत्तेचे कारण अजून स्पष्ट झाले नसून प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे. सहा महिन्यापूर्वीही विषारी औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा सूरजने प्रयत्न केला होता. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत.

loading image
go to top