esakal | "मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे"; असं म्हणत तरुणानं संपवली जीवनयात्रा; घटनेपूर्वी चिठ्ठीत नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

"मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे"; असं म्हणत तरुणानं संपवली जीवनयात्रा

"मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे"; असं म्हणत तरुणानं संपवली जीवनयात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) ः नगर परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या बोंडेगाव (Chandrapur district) येथील एका 34 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. आजारपणाला (illness) कंटाळून युवकाने आत्महत्या केली. मृताचे नाव नितीन केशव राऊत (वय 34) आहे. ही घटना 30 एप्रिल रोजी घडली. (Man end his life due to illness and depression in Chandrapur)

हेही वाचा: महाराष्ट्र अँटीबायोटीक कंपनीचा तब्बल १०० कोटीचा निधी गहाळ; सहा वर्षानंतरही कंपनीला कुलूपच

मृत युवकाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोंडेगाव येथील नितीन राऊत हा अविवाहित तरुण होता. घटनेच्या दिवशी 30 एप्रिलला तो दुपारपासून घरून बेपत्ता होता. उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.

राऊत यांच्या नवीन घराचे काम शेजारी सुरू होते. तिथेच गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.मृत युवक हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे गावातील काही नागरिकांनी सांगितले. पोटाच्या आजाराने तो त्रस्त होता.

हेही वाचा: दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव

काही महिन्यांपूर्वीच त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आजारपण व काही कारणाने तो मानसिकरित्या खचल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलिस हवालदार गौरकार करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top