esakal | Success Story: अवघ्या अर्ध्या एकराच्या नर्सरीतुन केला सात एकरावर विस्तार; वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल थक्क 
sakal

बोलून बातमी शोधा

Man getting 20 LPA from business of plants in Bhandara

2013 मध्ये अवघ्या अर्धा एकरावर राजू भोयर यांनी सुरु केलेला प्रवास आता सात एकरापर्यंत पोहोचला आहे. यातून त्यांना वार्षिक 20 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. तर, लागवड मजुरी, खतं ,बियाणे यांसाठीच वार्षिक 10 लाख रुपये खर्च येत असून 10 लाखांचा फायदा मिळत आहे.

Success Story: अवघ्या अर्ध्या एकराच्या नर्सरीतुन केला सात एकरावर विस्तार; वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल थक्क 

sakal_logo
By
भोजराम तिजारे

भंडारा : जिल्ह्यातील पालोरा येथील राजू भोयर या शेतकऱ्यांनी अर्धा एकर शेतीमधून नर्सरीचा प्रवास सुरु केला होता.राजू भोयर यांच्या ओम रोझ नर्सरीत 50 प्रजातीचे झाडे आहेत. तर, भोयर यांनी आपल्या नर्सरीत गावातील 30 लोकांना रोजगार सुद्धा दिला आहे. नर्सरीतून आता आंध्र प्रदेश ते पश्चिम बंगालपर्यंत फूल झाडांच्या रोपांची विक्री केली जाते. भोयर यांना आता झाडे विकायला जावे लागत नाही. भंडारा, गोंदिया,बालाघाट येथील व्यावसायिक गाड्या भरून फुलांची झाडे नेत आहेत.

हेही वाचा - काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का? जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले... 

2013 मध्ये अवघ्या अर्धा एकरावर राजू भोयर यांनी सुरु केलेला प्रवास आता सात एकरापर्यंत पोहोचला आहे. यातून त्यांना वार्षिक 20 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. तर, लागवड मजुरी, खतं ,बियाणे यांसाठीच वार्षिक 10 लाख रुपये खर्च येत असून 10 लाखांचा फायदा मिळत आहे.

राजू भोयर त्यांच्या सात वर्षांच्या प्रवासाविषयी बोलताना सांगतात की दरवर्षी नर्सरीचा विस्तार होत आहे. अर्ध्या एकरातून सुरु केलेल काम आता सात वर्षांपर्यंत पोहोचलं आहे. त्यांच्या नर्सरीत फुलांच्या रोपांसह फळ झाडांची रोपं मिळतात. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया येथील व्यापारी नर्सरीमध्ये येऊन रोपं घेऊन जातात, असं राजू भोयर यांनी सांगितलंय. 

हेही वाचा - आता प्रदेशाध्यक्षपदही विदर्भालाच, काँग्रेसचा 'हात' विदर्भाच्याच डोक्यावर का...

उषा बोन्द्रे या राजू भोयर यांच्या नर्सरीत मजुरी करतात. वर्षभर रोजगार मिळत असल्यानं येथे काम करत असल्याचं त्या सांगतात. प्राण टेम्भूरकर हे गेल्या ५ वर्षांपासून राजू भोयर यांच्या नर्सरीत सहकुटुंब कामाला येतात. नर्सरीत वर्षभराचं काम मिळत. असल्याचं त्यांनी सांगितलेय. आमच्या सारख्या सामान्य माणसांना नर्सरीमुळे कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध झाल्याचं ते सांगतात. शेती परवडणारी नाही अशी नेहमी शेतकऱ्यांची ओरड असते, मात्र शेतीमध्ये योग्य नियोजन केलं तर शेतीमधून सुद्धा आर्थिक उन्नती साधता येते हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिल आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image