अखेर 'तिला' मिळाला न्याय! अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला वीस वर्षांची शिक्षा

प्रकाश गुळसुंदरे 
Sunday, 24 January 2021

न्यायाधीश (1) ए. ए. सईद यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. 8 मार्च 2019 सकाळी नऊच्या सुमारास आसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळविरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 

परतवाडा (जि. अमरावती) ः अचलपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विजय मनोहरराव जवंजाळ (रा. रावळगाव, ता. अचलपूर) याला वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा - अखेर छडा लागला! पत्नीच्या प्रेमसंबंधास पतीचा होता विरोध; प्रियकराच्या मदतीने काढला काटा 

न्यायाधीश (1) ए. ए. सईद यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. 8 मार्च 2019 सकाळी नऊच्या सुमारास आसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळविरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 

घटनेच्या दिवशी पीडित मुलगी ही खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. जवंजाळ याने पीडितेला बोलावून समाजमंदिराच्या आत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या पालकांनी तक्रार केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. ए. पी. पालवे यांनी याप्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

नक्की वाचा - एक चूक आणि उडाला भडका; क्षणार्धात उध्वस्त झाला संसार  

 सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील डी. ए. नवले यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने एकूण आठ साक्षीदार तपासले. न्यायाधीश ए. ए. सईद यांनी आरोपी विजय जवंजाळ याला वीस वर्षे सक्तमजुरीसह 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीस सहा महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. पैरवी अधिकारी म्हणून सतीश बुंदे यांनी काम पाहिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man got jail of 20 years as he misbehaved with girl in Yavatmal