पाचवर्षीय चिमुकलीच्या न्यायासाठी एकवटले अकोलेकर

विवेक मेतकर
शुक्रवार, 23 मार्च 2018

नराधमाने गेल्या 8 मार्च रोजी शाळेशेजारील पडक्या खोलीत अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधमांला अटक केली. मात्र, अद्यापही इतर सहकारी आरोपी मोकटच आहेत.

अकोला - जळगाव जिल्ह्यातील दोंडाई येथील एका शाळेतील पाच वर्षीय चिमुकलीवर स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधमाने गेल्या 8 मार्च रोजी शाळेशेजारील पडक्या खोलीत अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली. मात्र, अद्यापही इतर सहकारी आरोपी मोकटच आहेत. या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा प्रशासन व शाळेतील कर्मचाऱ्यांना अटक करावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. यासह इतर मागण्यासाठी अकोल्यात आज (ता. 23) अकोला क्रिकेट मैदान येथून सकाळी 10 वाजता जनआक्रोश मुक मोर्चा सुरवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला.

हजारोंचा सहभाग
जनआक्रोश मुकमोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो महिला, युवक, युवती व शालेय विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चास पाठींबा देत चिमुकलीच्या न्यायासाठी एकत्र आले. 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना चिमुकलीला न्याय देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. प्रकरणाची योग्य चौकशी करुन आरोपींना शिक्षा देण्यास प्रशासना कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलांनी व्यक्त केला निषेध
चिमुकलीवर अत्याचार होतो, तीच्या गावतच न्याय मिळत नाही. विशेष म्हणजे ज्या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य होते ती संस्थाही तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतल्या जात नाही. कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळत नाही. जळगावला नातेवाईकांकडे जाऊन उपचार करावे लागते. आर्थिक परिस्थिती कमजोर असताना कुणीही तिच्या मदतीला येत नाही. या अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमांना पाठीशी घातल्या जाते. या सर्वघटनेने समाजमन ढवळून निघाले. आई-वडीलांना खटला मागे घेण्यासाठी धमक्या येतात अशा प्रकारचे मनोगत जनआक्रोश मोर्चात  सोनाली नालिंदे, ढवळेताई, स्वप्नाताई राऊत, वर्षाताई राऊत, अश्विनीताई मेहरे यांनी  व्यक्त केले.

Web Title: a man had tortured a girl in school