
यवतमाळ : शहरातील दत्त चौकात भाजीपाला घेताना चोरट्याने मोबाईल लंपास केला. त्यानंतर मोबाईलमधील ‘यूपीआय’व्दारे तब्बल दोन लाख ४७ हजार ५४१ रुपये लंपास केले. हा प्रकार मागील महिन्यात घडला. या प्रकरणी तुषार मधुकर महाजन (वय ४९, रा. माईंदे चौक, यवतमाळ) यांनी रविवारी (ता. ३) दुपारी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.