esakal | अत्याचार करणाऱ्या पित्याला 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; दोन्ही महिलांची कारागृहात रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Man misbehaved with daughter in Amravati

पती-पत्नी पाच वर्षापासून विभक्त राहते. अल्पवयीन मुलगी आजीआजोबांच्या भेटीकरीता पित्याकडे येत होती. परंतु पीडित मुलीच्या ध्यानीमनी नसताना, ती झोपेत असताना, जन्मदात्यानेच तिच्यावर अत्याचार केला

अत्याचार करणाऱ्या पित्याला 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; दोन्ही महिलांची कारागृहात रवानगी

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर (वय 12) अत्याचारप्रकरणी फरार पित्याला राजापेठ पोलिसांनी गुरुवारी (ता. 14) रात्री अटक केली. जिल्हा न्यायालयाने पिडीतेच्या पित्याला सोमवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली.

पती-पत्नी पाच वर्षापासून विभक्त राहते. अल्पवयीन मुलगी आजीआजोबांच्या भेटीकरीता पित्याकडे येत होती. परंतु पीडित मुलीच्या ध्यानीमनी नसताना, ती झोपेत असताना, जन्मदात्यानेच तिच्यावर अत्याचार केला. पीडीतेने घटनेची माहिती कुटुंबातील दोन महिलांना दिली. मार्च 2019 मध्ये ही घटना घडली. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

घरातील महिलांना घटनेची माहिती असूनही बदनामी होईल म्हणून पोलिसात तक्रार देण्याचे टाळले. अखेर पीडित मुलीने आईला घटनाक्रम सांगितला. आईने पीडितेसह राजापेठ ठाणे गाठून तक्रार केली. जानेवारी 2021 मध्ये मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यासह कटात सहभागी दोन महिला अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पीडितेच्या पसार पित्यालाही अटक झाली. 

तिघांनाही आज (ता. 15) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पीडीतेच्या पित्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. महिलांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. असे दुय्यम पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image