त्याची नजर पडली एका मुलाच्या आईवर; नंतर घडला हा प्रकार... 

woman said no for wedding then man did this to her read full story 
woman said no for wedding then man did this to her read full story 

अमरावती : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असते असं म्हणतात. पण, एकतर्फी प्रेमात असलेले लोकं कधी काय करतील याचा काही नेम नाही. यामुळे मुलीला नाहक त्रास सहन करावा लागतो. वेळप्रसंगी घरही सोडावे लागते. तरीही एकतर्फी प्रेम करणाऱ्यांपासून सुटका मिळत नाही. अशीच एक घटना अमरावतीच्या खोलापुरीगेट हद्दीत घडली आहे. चला तर जाणून घेऊया... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या खोलापुरीगेट हद्दीत विवाहित महिला मुलगा व आईसोबत भाड्याच्या खोलीत राहते. याच वस्तीत तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा संदीप राहतो. विवाहितेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या युवकाने लग्न करायची इच्छा बोलून दाखवली. मात्र, विवाहितेने युवकाला लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच आपला पाठलाग न करण्यास सांगितले होते. मात्र, एकतर्फी प्रेम करणारा संदीप तिचा पाठलाग करीतच होता. 

सततच्या त्रासामुळे विवाहिता त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने खोलापुरीगेट हद्दीतील खोली सोडून दुसरीकडे राहण्याच्या निर्णय घेतला. ती मुलगा आणि आईसह दुसरीकडे राहायला गेली. मात्र, संदीपच्या मनातून विवाहिता काही निघाली नाही. तो काही केल्या तिला विसरू शकला नाही. त्यामुळे संदीपने विवाहितेचा पाठलाग सुरूच ठेवला. 

विवाहितेला संदीपने जयस्तंभ चौकात गाठून बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच आपले प्रेम स्वीकारण्याची विनंती केली. मात्र, विवाहितेला हे मान्य नव्हते. त्यामुळे तिने संदीपला स्पष्ट शब्दात पुन्हा नकार दर्शवला. विवाहितेसोबत रस्त्यावर सुरू असलेला वाद बघून काही नागरिक जमा झाले. जमा झालेले नागरिक आपल्याला मारतील या भीतीपोटी संदीपने विवाहितेला धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर विवाहितेने पोलिस ठाण्यात संदीपविरुद्ध तक्रार दाखल केली. 

दुसऱ्याकडून मिळविला विवाहितेचा नंबर

आपल्याच वस्तीत पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या विवाहितेवर संदीपची नजर पडली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा उपयोग करण्याचा विचार त्याच्या मनात आला. यामुळे तो तिचा सतत पाठलाग करीत असायचा. त्याने दुसऱ्याच्या मदतीने विवाहितेचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. मोबाईलवरून तिच्यासोबत संपर्क साधून लग्नाची मागणी करू लागला. मात्र, तिने नकार दिला. तरीही तो सुधरायला तयार नव्हता. 

चौकात बोलावले भेटायला

विवाहिता मोबाईलवर भाव देत नसल्याने संदीपने तिला गांधी चौकात भेटण्यासाठी बोलावले होते. एकदाची समजूत काढण्याचे विचारातून तिने संदीपला भेटण्यास होकार दिला. दोघेही चौकात भेटले असता तिने संदीपची कानउघाडणी केली. त्यांचा वाद पाहून चौकातील काही नागरिकांनी संदीपची समजूत काढली. यावेळी त्याने विवाहितेला त्रास देणार नाही, असे वचन दिले. मात्र, त्यांनतरही तो शांत बसला नाही. 

अखेर गाठले पोलिस ठाणे

संदीपला लग्नास स्पष्ट नाकर दिल्यानंतरही तो पाठलाग करीत होता. नागरिकांनी समजूतन काढल्यानंतही तो सुधरायला तयार नव्हता. यामुळे विवाहिता त्रस्त झाली होती. रोजरोजच्या त्रासाला ती कंटाळली होती. यामुळे तिने पोलिसांना याची माहिती देण्याचे ठरवले. तिने खोलापुरीगेट ठाण्यात धाव घेत संदीपविरुद्ध तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com