ऊर्जाराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हवी रिक्तपदांना "ऊर्जा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

यवतमाळ : महावितरणचे जिल्ह्यात विस्तीर्ण यंत्रणा उघड्यावर आहे. परिणामी प्राणांतिक व अप्राणांतिक घटनांची संख्या मोठी आहे. अशा घटनांची चौकशी, महावितरणच्या अनेक प्रोजेक्‍टची निरीक्षणाची जबाबदारी विद्युत निरीक्षण कार्यालयाची आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, अपघाताची संख्या त्यातुलनेत विद्युत निरीक्षक कार्यालयातील अपुरे मनुष्यबळ यामुळे आता ऊर्जाराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीतील अनेक पदेरिक्त आहेत. त्यांनाच "ऊर्जा' देण्याची गरज आहे.

गेल्या वर्षभरात शॉक लागून प्राणांतिक व अप्राणांतिक अपघातांची संख्या मोठी आहे. मागील काही दिवसांत झालेल्या घटनांमध्ये दहापेक्षा जास्त प्राणांतिक नुकसान झाले. त्यात मनुष्य, जनावरे यांचा समावेश आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनात करण्यात येणाऱ्या उपाययोजना, स्थळ निरीक्षण यासाठी महावितरणला मार्गदर्शन करण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालय आहे. जिल्ह्याची व्याप्ती, अपघातांची संख्या पाहता हा विभाग सुसज्ज असणे गरजेचे आहे. त्यातही ऊर्जाराज्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने या विभागातील रिक्तपदांची संख्या दूर होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा विभाग दुर्लक्षित आहे. पावसाळा असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयात केवळ तीन अभियंते कार्यरत आहेत. कार्यालयात कामकाज करणाऱ्या लिपिकांची संख्या कमी आहे. परिणामी अनेक कामांचा खोळंबा झाला आहे. अप्रत्यक्षरीत्या महावितरणच्या कारभारावर विद्युत निरीक्षक कार्यालयाचे नियत्रंण आहे. मात्र, सध्या याच विभागाला ऊर्जा देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत एक लिपिक व तीन अभियंत्यांवर या विभागाचा कारभार सुरू आहे.

Web Title: man power shortage in mseb department