कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

Man taking production of 10 lakh kilogram of chicken in Amravati
Man taking production of 10 lakh kilogram of chicken in Amravati

अमरावती : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनानं टैमान घातलं आहे. भारतातही कोरोनामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. इतकंच नाही तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका बसला होता तो पशुपालन आणि पोल्ट्री उद्योगाला. पण या सगळ्यातूनही मार्ग काढत एका व्यक्तीने चिकनचे विक्रमी उत्पादन करून दाखवले आहे. 

कोरोनाच्या संकटात सर्वांत जास्त फटका बसलेल्या पोल्ट्री उद्योगाला उभारी मिळणे कठीण असल्याचा समज करून अनेकांनी या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु अतिशय तंत्रशुद्ध तसेच प्रचंड आत्मविश्वासाने हा व्यवसाय पुढे नेणा-या अमरावतीच्या डॉ. शरद भारसाकळे यांनी नवी झेप घेतली आहे. दर महिन्याला १० लाख चिकनचे उत्पादन करून खवय्यांना त्यांनी मेजवानीच दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनापूर्वी त्यांचे जे उत्पादन होते त्यात आता ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोनाचे संकट नेहमीसाठी राहणार नाही, याची खात्री आधीच होती. त्यामुळे काही काळ ब्रेक बसला असला तरी स्थिती सुधारल्यावर परत एकदा लोकं या खाद्याकडे वळतील, याची माहिती होती. त्यामुळे qहमत न हरता भविष्यासाठी तरतूद करून ठेवली व आता स्थिती सुधारताच विक्रमी उत्पादनाला सुरुवात केल्याचे डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले. कोरोनाच्या पूर्वी जे उत्पादन होते त्यापेक्षा आता ३० टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. त्यावरून अमरावतीच्या या खास अमृता चिकनला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे, हे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, डॉ. शरद भारसाकळे हे पोल्ट्री सायन्सचे तज्ज्ञ आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी संशोधन करून अमृता चिकनची निर्मिती केली आहे. हे काही वेगळे चिकन नाही. सामान्यच कोंबड्या आहेत. केवळ न्यूट्रिशनवर लक्ष देऊन हे साध्य झाले आहे. या व्यवसायात उत्पादनात खंड पडू न देणे आवश्यक आहे. यासोबतच हिंमत न हारता पुढे जाणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यवसायात अप अ‍ॅण्ड डाउन असतातच, त्यामुळे भविष्याची तरतूद अतिशय आवश्यक आहे व त्यादृष्टीने तयार राहावे लागते, असे अमृता हॅचरीज अ‍ॅण्ड फूडचे संचालक डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले.

गेल्या २५ वर्षांपासून या व्यवसायात असल्याने विविध प्रयोग करून चिकन जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होईल, याचा प्रयत्न करण्यात आला. अ‍ॅन्टीबायटिकचे प्रमाण कमीत कमी असेल याची काळजी घेण्यात आल्यानेच ग्राहकांकडून त्याला पसंती दिली जात आहे. चिकनची क्वालिटी चांगली राहील, त्यातील ताठरपणा कमी राहील याची काळजीसुद्धा घेण्यात आली. त्यामुळेच आज येथील अमृता चिकन हे रायपूर, मालेगाव, हैदराबाद, आदिलाबाद आदी शहरांमध्येसुद्धा जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com