अश्‍लील व्हिडिओ काढून लैंगिक शोषण; वर्धा जिल्ह्यातील युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man threat friend by taking objectionable photos

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव (मेघे) येथील एका युवतीची राजूसोबत ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. भेटीगाठी वाढत गेल्याने या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले.

अश्‍लील व्हिडिओ काढून लैंगिक शोषण; वर्धा जिल्ह्यातील युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा : मैत्रीतून दोघांत प्रेमसंबध निर्माण झाले. या संबंधातातून युवकाने आपल्या मैत्रिणीचे अश्‍लील छायाचित्र आणि व्हिडिओ काढून तिचे लग्न झाल्यानंतर बदनामीची भीती दाखवीत तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीवरून पोलिसांनी या युवकाला अटक केली. राजू वाही ऊर्फ नागराजू येदुल्ला रा. बोरगाव (मेघे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव (मेघे) येथील एका युवतीची राजूसोबत ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. भेटीगाठी वाढत गेल्याने या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून त्यांच्यात संबंध निर्माण झाला. यावेळी त्यांच्यात झालेल्या संबंधाचे त्याने चित्रीकरण केले. शिवाय युवतीचे अश्‍लील छायाचित्रही काढले.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

या दोघांतील संबंध संपल्यानंतर तिचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर राजू याने काही काळानंतर तिला तिचे अश्‍लील छायाचित्र आणि व्हिडिओ पाठवून बदनामी करण्याची धमकी देत तिचा पती घरी नसताना तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. बदनामीपोटी राजूने तिचा गर्भपातही केला. 

त्याचा हा प्रकार वाढत असल्याने अखेर युवतीने वर्धा शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा राजूला अटक केली. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. 

क्लिक करा - पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल

आरोपीला शहर पोलिसांनी तक्रारीवरून अटक केली. हा प्रकार बोरगाव (मेघे) येथे घडला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी केली. प्रकरणाचा तपास सचिन दवाळे, किशोर साटोणे, विनोद टेंभेकर करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top