दारू पिऊन स्वतःच्या जन्मदात्रीलाच करत होता शिवीगाळ; हटकले म्हणून केला वडिलांचा खून  

man took extreme step as father stop him to abuse mother
man took extreme step as father stop him to abuse mother

शिरसगाव कसबा ( जि. अमरावती )  : शिरसगावकसबा हद्दीत सालेपुर पांढरी येथे मुलाने वृद्ध पित्यावर चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला. गणेश गायकवाड (वय 62, रा. सालेपुर पांढरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलगा मंगेश गणेश गायकवाड (वय 32) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी (ता. 23) अटक केली. असे पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी सांगितले. 

पतिपत्नी, लहान मुलगा व सून हे गावातच वेगळे राहत होते. तर, व्यवसायाने ट्रकचालक असलेला मंगेश हा आपल्या कुटुंबासह गावात शेजारीच राहत असे. त्याला वडिलांनी अर्धी शेती सुद्धा नावे करून दिली. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून तो आईवडिलांना शिवीगाळ करून त्यांना मानसिक त्रास देत होता. गुरुवारी (ता. 22) रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोर आई नलू गणेश गायकवाड (वय 55) या उभ्या असताना, मुलगा मंगेशने काही कारण नसताना आईला शिवीगाळ सुरू केली. 

समजूत काढल्यानंतरही तो शांत होत नव्हता. त्यामुळे वडील गणेश गायकवाड यांनी घराबाहेर पडून पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या मंगेशला हटकले असता, त्याने वडिलांनाही तशीच शिवीगाळ सुरू केली. घरात जाऊन त्याने चाकू आणला. पित्यासोबत झटापट झाल्यावर त्याने चाकूने चार ते पाच सपासप वार केले. रक्ताने माखलेला चाकू फेकून तो फरार झाला. 

जखमीस पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची पत्नी नलू गणेश गायकवाड यांनी घटनेची तक्रार शिरसगावकसबा ठाण्यात केली. पोलिसांनी फरार मुलगा मंगेशविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

शेजारी राहणारा मुलगा काही दिवसांपासून आईवडिलांना मानसिक त्रास देत होता. खुल्लक कारणावरून खुनाची घटना घडली.
- गोपाल उपाध्याय, 
पोलिस निरीक्षक, शिरसगावकसबा.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com