COVID19 : संशयित म्हणून त्याच्या सुरू होत्या तपासण्या अन् मध्येच तो झाला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

कोरोना या विषाणू जन्य व लॉकडाउनमुळे अनेक मजुरांनी गावचा रस्ता धरला. यातच उंबर्डा बाजार येथे सुद्धा गोरेगाव, अंधेरी, सुरत, पुणे अनेक व्यक्ती 13 मे रोजी दाखल झाले होते.

उंबर्डाबाजार (जि.वाशीम) : गोरेगाव (मुंबई) येथून उंबर्डा बाजार येथे आलेल्या नागरिकांची बुधवारी (ता.13) उंबर्डाबाजार आरोग्यवर्धिनी केंद्रात तपासणी करण्यात आली. मात्र, या मधील एका व्यक्तीला ताप, सर्दी, पडसा, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यामुळे त्याला तातडीने वाशीम येथे पाठविण्यात आले होते. मात्र, तपासणी दरम्यान काही चाचण्या होण्याआधीच उंबर्डाबाजार येथे गुरुवारी (ता.14) सकाळी पळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.

सविस्तर, कोरोना या विषाणू जन्य व लॉकडाउनमुळे अनेक मजुरांनी गावचा रस्ता धरला. यातच उंबर्डा बाजार येथे सुद्धा गोरेगाव, अंधेरी, सुरत, पुणे अनेक व्यक्ती 13 मे रोजी दाखल झाले होते. यांची आरोग्य वरधिनी केंद्रात रीतसर तपासणी करण्यात आली. यावेळी यामधील गोरेगाव, मुंबई येथून आलेल्या एका व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे त्याला तातडीने वाशीम येथे पाठविण्यात आले होते. मात्र, तपासणी दरम्यान काही चाचण्या बाकी राहिल्या असताना आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गाला गुंगारा देवून 14 मे रोजी सकाळी उंबर्डा बाजार येथे आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली होती. 

महत्त्वाची बातमी - अजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

वाशीमच्या आरोग्य विभागाने तातडीने घटनेची माहिती कारंज्याच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण जाधव यांना देवून जाधव तातडीने उंबर्डाबाजार गाठून उंबर्डाबाजार आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. नांदे यांनी पोलिस विभागाला दिली. पोलिस विभाग, आरोग्य विभाग तथा समिती सदस्याच्या सहकार्याने सदर इसमाचा शोध घेऊन त्याची पुन्हा आरोग्य तपासणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारंजा येथील एम. बी. आश्रमातील तपासणी कक्षात रूग्णवाहीकेच्या माध्यमातून पाठविण्यात आले.

आवश्यक वाचा - अहो आश्चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले ९० कोटी

यावेळी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आर. पी. भास्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण जाधव, उंबर्डाबाजार आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. नांदे, डॉ. भगत, सरपंच नागोलकर, पोलीस पाटील उमेश देशमुख, पटवारी शांताराम मुंडाळे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र खंडारे याचेसह उंबर्डाबाजार पोलीस चौकीचे  कैलास गवई, डि. बी .स्कॉडचे शेषराव जाधव, पो. कॉ. अमित भगत, ग्रामपंचायत कर्मचारी फिरोजखान यांची उपस्थिती होती. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रामपंचायत प्रशासनाने जि. प. विद्यालयाच्या विलगीकरण कक्षाचा परिसरासह व्यक्ती राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man who was sent to Washim for a health check-up fled