महिनाभरात सुरू होणार मनीषनगर आरयूबी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नागपूर ः मनीषनगर येथे रेल्वे भूमिगत पूल (आरयूबी) महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मनीषनगरसह बेसा, बेलतरोडीतील लाखो नागरिकांचा अनेक वर्षांचा मनस्ताप संपुष्टात येणार आहे. महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले या भूमिगत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

नागपूर ः मनीषनगर येथे रेल्वे भूमिगत पूल (आरयूबी) महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मनीषनगरसह बेसा, बेलतरोडीतील लाखो नागरिकांचा अनेक वर्षांचा मनस्ताप संपुष्टात येणार आहे. महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले या भूमिगत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मनीषनगरसह बेसा, बेलतरोडी, पद्मावतीनगर व इतर वस्त्यांमधून वर्धा रोडपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून यावे लागत होते. दहा-दहा मिनिटांनी फाटक बंद होत असल्याने नागरिकांचा बराच वेळ व्यर्थ जात होता. अनेकांना कार्यालय, व्यावसायिक ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे वर्धा मार्गापर्यंत थेट पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाची नागरिकांनी मागणी लावून धरली होती. गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची ही मागणी आता पूर्ण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पर्यायी भूमिगत पुलाचे काम महामेट्रोकडे सोपविले होते. महामेट्रोने जलदगतीने कामे केली. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून महिनाभरात नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या भूमिगत पुलाची लांबी 500 मीटर असून दुपदरी रस्ता असल्याने नागरिकांना दोन्ही बाजूने ये-जा करता येणार आहे. बॉक्‍स कल्व्हर्टचे कार्य पूर्ण झाले असून जॉइंट एक्‍सपाशनचे कार्य सुरू आहे. आरयूबीच्या सुरुवातीच्या मार्गावरील कामे पूर्ण झाली. येथे पॉली-कॉर्बोनेट शीट लावण्याचे कामे सुरू आहे. आरयूबीमध्ये पावसाचे पाणी जमा होऊ नये, ते निघून जाण्यासाठी तीन चेंबर तयार करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manishnagar RUB to be launched in a month