
समुद्रपूर (जि. वर्धा) : नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष मनोज खोंडे याने ग्राहकांना एक कोटी २० लाख रुपयांचा गंडा दिला. या प्रकरणी ग्राहकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मनोज खोंडे याच्यासह सुभाष चाफले (रा. लोखंडी) आणि श्रीकांत घाटे (रा. कवठा, ता. समुद्रपूर) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.