esakal | डॉक्टरांचा सरकारला ‘अल्टिमेटम’! पत्र देऊन दुसऱ्यांदा मागितली आत्महत्येची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरांनी पत्र देऊन दुसऱ्यांदा मागितली आत्महत्येची परवानगी

कोविडच्या संकटात आरोग्यसेवेसाठी बहुमोल योगदान देत आहेत, असे असतानाही शासनाने घेतलेला मानधनवाढीचा निर्णय लागू करण्यास दहा महिने लोटले आहे.

डॉक्टरांनी पत्र देऊन दुसऱ्यांदा मागितली आत्महत्येची परवानगी

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (अमरावती) : भरारी पथकातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची (Medical officer) मानधनवाढ (Increase in honorarium) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन दहा महिने झाले. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे ही वाढ तातडीने करावी, अन्यथा आत्महत्या (Suicide) करण्याची परवानगी द्यावी, असी मागणी मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा: अमरावती जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांना मिळेना हक्काचे छप्पर

महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेअंतर्गत २८१ डॉक्टर कार्यरत आहेत. ज्यामध्ये २२ डॉक्टर मेळघाटातील आहेत. नवसंजीवनी योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांच्या आदिवासी भागात जाऊन सेवा देतात, सोबतच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात व अतिदुर्गम संवेदनशील भागातील जवळपास आठ ते दहा गावांना सेवा देत आहेत. यादरम्यान ते बाह्यरुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्यकेंद्रांना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करीत असतात. विशेष म्हणजे त्यांना मानधनाव्यतिरिक्त इतर लाभ मिळत नाहीत.

हेही वाचा: अमरावती विभागात डेंगीच्या रुग्णसंख्येत घट, तीन वर्षांत फक्त पाच बळी

कोविडच्या संकटात आरोग्यसेवेसाठी बहुमोल योगदान देत आहेत, असे असतानाही शासनाने घेतलेला मानधनवाढीचा निर्णय लागू करण्यास दहा महिने लोटले आहे. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांनी आता शासनाने स्थायीचा निर्णय घ्यावा आणि तत्काळ मानधनवाढ करावी, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी अखेरची मागणी दुसऱ्यांदा पत्र लिहून केली आहे.

हेही वाचा: संचारबंदीत रस्त्यावर आरटीपीसीआर चाचणी; अमरावती महापालिकेचा उपक्रम

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चाळीस हजार रुपये मानधन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दहा महिन्यांपासून शासनदरबारी धूळखात आहे. डॉक्टरांचा अंत ना पाहता या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करावी.

- डॉ. विशाल देशमुख, भरारी पथक मेळघाट.

दहा महिने होऊनसुद्धा फाईल इकडून तिकडे फिरत आहे. त्यामुळे आता आमचा अंत न पाहता शासनाने मानधनवाढ, तसेच स्थायी करण्याचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा डॉक्टरांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी.

-डॉ. शेषराव सूर्यवंशी, अध्यक्ष भरारी पथक मुंबई.

loading image