पतंगाच्या मांजाने चिरले अनेकांचे गळे

पतंगाच्या मांजाने चिरले अनेकांचे गळे

नागपूर - नायलॉन मांजावर बंदी आहे. परंतु बंदीनंतरही नायलॉन मांजा लावून पंतग उडवली जात आहे. बेजबाबदारपणे पतंग उडवणाऱ्यांचा आतंक शहरात आहे. मनात येईल तशी पतंगबाजी खेळली जात असल्यामुळे शहरात पन्नासावर नागरिक मांजाने जखमी झाले. विशेष असे की, मेडिकलमध्ये सात तर मेयोत दहा जणांपेक्षा अधिक जणांचा अपघात होऊन जखमी झाले. मेयो रुग्णालयात एकाचा गळा चिरला गेला, नशीब बलवत्तर म्हणून हा व्यक्ती थोडक्‍यात बचावला. 

वाहन चालवतांना गळ्यात किंवा अंगात मांजा अडकून श्रावण बोबडे हा व्यक्ती जखमी झाला. त्यातील नऊ रुग्ण मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आले. मेयोत आलेल्या चारपैकी एका रुग्णाचा गळा थोड्या प्रमाणात मांजामुळे कापला होता. तर चौघांच्या गळ्यात मांजा अडकल्यामुळे ते वाहनावरून खाली पडल्याने जखमी झाले. तर मेडिकलमध्ये उपचाराला आलेल्या पाचपैकी एका रुग्णाचा गळा, दोन रुग्णांचे बोट मांजामुळे थोड्या प्रमाणात कापले गेले. तर इतर रुग्ण हे गळ्यात मांजा अडकल्याने खाली पडल्याने जखमी झाले आहेत. पतंग उडवताना गच्चीवरून पडल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात जखमींची संख्या बघता दुपटीने खासगी रुग्णालयात रुग्णांनी उपचार घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपराजधानीत सुमारे पन्नास जण जखमी झाले असावेत असे सांगण्यात आले. मकरसंक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा उत्सव नागपुरात चांगलाच रंगतो. त्यात पतंग शौकिनांच्या उत्सवाला तर उधाण येते. उपचाराकरिता मेयो, मेडिकलमध्ये लवकर हलवण्यात आल्यामुळे डॉक्‍टरांनी तातडीने उपचार सुरू केले. पतंग उडवताना झालेल्या घटनांची नोंद पोलिसांनी नोंदविली आहे. रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com