पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले माओवाद्यांचे शिबिर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

गडचिरोली : एटापल्ली तालुक्‍यातील हालेवारा पोलिस मदत केंद्रांतर्गत कुंडुम जंगलात गुरुवारी (ता.11) सकाळी 9 वाजताच्या सुमारास सी-60 पथकाचे जवान व माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. घटनास्थळी आढळलेल्या काही पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्यावरून या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सी-60 पथकाचे जवान कुंडुम परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे 25 ते 30 पिट्टू, डेटोनेटर, कॅमेरा, फ्लॅश, मल्टीमीटर व अन्य नक्षल साहित्य आढळून आले. त्यामुळे या ठिकाणी नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maoist camp destroyed by police