Breaking : नक्षली नेता सृजनाक्काचा खात्मा झाल्याने नक्षलवादी चवताळले, आता घडवला हा उत्पात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

गेल्या महिन्यात नक्षली नेता सृजनाक्का एका चकमकीदरम्यान पोलिसांकडून मारल्या गेली. या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी बुधवारी (ता. २०) गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केली आहे.

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. १९) रात्री नक्षलवाद्यांना पुन्हा उत्पात घडवून आणला. काही शसस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहनाची जाळपोळ केली. या घटनेमुळे कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्यात नक्षली नेता सृजनाक्का एका चकमकीदरम्यान पोलिसांकडून मारल्या गेली. या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी बुधवारी (ता. २०) गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सावरगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीजवळ त्रिशूल पाइंटवर शनिवारी रात्री छत्तीसगडमधून वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला आग लावून पेटवून दिले. यात तीन हायवा व एका ट्रकचा समावेश आहे.

चारही वाहने गडचिरोली येथील एका वाळू कंत्राटदाराची असल्याची माहिती आहे. नक्षल्यांनी ट्रकच्या चालक व सहकाऱ्यांना ऊतरवून तिथून निघून जाण्याची सूचना केली. त्यानंतर चारही वाहनांना आगीच्या हवाली केले. रात्री अचानक मोठा धूर व ट्रकचे टायर फुटल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरीकांना घटनेचा अंदाज आला.

"रेड झोन'बाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतली ही भूमिका..

बुधवारी सकाळी ही बातमी सावरगाव पोलिसांपर्यंत पोचल्यानंतर पोलिसांनी या परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरू केले आहे. तीन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यात नक्षल पोलिस चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. त्यामुळे आणखी ही घटना घडल्यामुळे नक्षल्याचा उत्पात वाढल्याचे दिसून येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maoist fire vehicles on road construction